कोण खरा मूर्ख ?
काही व्यक्ती असतात बघा ज्या स्वतःला सारखं मूर्ख म्हणून घेतात..
ती (व्यक्ती) म्हणते मी सगळ्यांसाठी इतकं करते ,पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कुणाचीच मला साथ मिळत नाही.. मी खूप मूर्ख !
ती म्हणते मी लोकांनी सुधराव म्हणून इतकी ओरडते तरी ते सुधरत नाहीत ..मीच मूर्ख !
ती म्हणते माझ्यात इतकी प्रगल्भता , पण माणसं जोडली त्यांची नाही इतकी पात्रता..मीच मूर्ख !
ती म्हणते मी इतकी कष्टाळू, मला भेटलेले सगळेच मात्र उंडगळू.. किती मी मूर्ख !
ती म्हणते, मी इतकी आस्तिक अध्यात्मिक, काहीच चांगलं शिकत नाहीत हे नास्तिक, खरचं मी मूर्ख !
कधी कधी कळत नाही मात्र..
हे खरंच असतात का इतके मूर्ख? की त्यांना वाटतं सगळ्यांना कळत असतं ते दुसऱ्यालाच म्हणत आहेत मूर्ख !!😊
प्रत्येक जण पडतोय, लढतोय आपली लढाई, त्यामुळे नकोच ती एक एकमेकांवर चढाई..
कारण तसं बघायला गेलं ..
तर सगळेच असतात मूर्ख !!
--Arti Honap
No comments:
Post a Comment