योगाचा योगयोग
कालपासून आमच्या योगा क्लास मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस ची तयारी चालू आहे.
आज आम्ही काही formations चा प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये माझा जेवढा हवा तेवढा सहभाग झाल्यावर मी मागे बसून माझेच काही व्यायाम एकटीने करत होते, तेव्हा सहज मनात विचार आला की योग म्हणजे नक्की काय?
आजकाल योगा हा शब्द जास्त प्रचलित आहे. माझा त्याच्यावरच विचार चालू होता की नक्की या शब्दाचा अर्थ काय? चालत घरी येताना डोक्यात तोच शब्द घोळत होता. मी मोबाईल नेत नसल्याने पटकन गुगल युनिव्हर्सिटी कडून काही ज्ञान मिळणार नव्हतं म्हणून एका अर्थी ते चांगलं झालं मी माझा विचार चालू ठेवला.
योगा म्हणलं की पटकन आठवतं ते म्हणजे आसन, प्राणायाम..पण आमच्या योगगुरू ताईने गुरवारी योगा ची theory घेतल्या मुळे योगा म्हणजे तेवढच नाही हे नक्की माहित होतं..
मग योग शी मिळते जुळते काही अजून शब्द आठवून बघितले. योगायोग, योग्यता योगि, योगिनी. योगायोग आणि योग्यता हे शब्द तर आपण खूप वेळा वापरतो " आज भलताच चांगला योग दिसतो आहे, जे तुम्ही आमच्या घरी आलात". किंवा " अहो, लग्न जमणे ह्या अगदी योगायोगाच्या गोष्टी आहेत. योग येईल तेव्हा जमेल". म्हणजे इथे याचा अर्थ जुळून येणे असा आपण वापरतो.
पण मग योग्यता हा शब्द कसा काय योग शी साधर्म्य असणारा आहे? तर त्याचा अर्थ वाक्यातून काढायचा झाला तर मनात वाक्य आले.." त्याच माणसाची खरी योग्यता आहे त्या खुर्चीवर बसण्याची" म्हणजे इथे त्याचा अर्थ झाला योग्य (Fit).. अरेच्चा म्हणजे हा शब्द ज्यासाठी क्लास लावला म्हणजे Fitness साठी ते. घरी पोचले..तरीही डोक्यात हेच चालू होते..परत Google University la पाचारण करावं असं वाटलं. पण काय द्राविडी प्राणायाम करायचं ठरवलंच होतं ना!! 😊
मग fitness आणि जुळवणे काहीतरी संबंध असला पाहिजे ..
मग आठवलं आमच्या योगा teacher ने सांगितलं होतं योग म्हणजे मन आणि शरीर ह्यांचं फिटनेस.. अरे वाह म्हणजे योग म्हणजे फिटनेस 👏👏
अरे पण मग जुळवणे म्हणजे काय योग मध्ये..काहीतरी अजून missing आहे..अजून काही अर्थ लागत नाहीये नीट..मग अजून अजून विचार करत राहिले..तेव्हा मग एकदम Eureka moment झाला आणि मन आणि शरीर ह्यांची जुळवणी .. wov म्हणजे योग म्हणजे फिटनेस साठी मन आणि शरीर ह्यांची जुळवणी...खरंच हे missing link लागली आणि मन आणि शरीर एकदम प्रफुल्लित झालं. 😊
आता म्हणलं नेमका या शब्दाचा अर्थ बघावा काय आहे तो? पण गुगलला पाचारण करावं असं अजूनही वाटत नव्हतच मग म्हटलं कुठल्या पुस्तकात ह्याचा अर्थ सापडेल का? तर योगायोगाने आमच्याकडे संस्कृत मराठी डिक्शनरी सापडली आणि त्यात मी योग या शब्दाचा अर्थ शोधला आणि तो असा त्यात लिहिलेला आहे.👇
मग मग म्हणलं फायनली आता गुगलची टेस्ट घ्यावी तो काय अर्थ सांगतो ते बघावं. तर त्या पठ्ठ्याने सुद्धा बरच मिळतं जुळतं उत्तर दिलं आहे ते बघा.. तिथे युज असा त्याचा अर्थ लिहिला आहे आणि म्हणूनच उपयोग असे आपण म्हणतो. युज हा इंग्रजी शब्द सुद्धा आपल्या संस्कृत पासूनच जन्मास आलेला आहे हे कळल्याने अतिशय आनंद झाला🤗
खरंच योग सोप्पं नाहीये..कुणालाही जोडून ठेवणे महाकठीण काम. पण थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्याला वयाच बंधन नाही की भाषेचं की अजून कशाच..
असो तर हे माझे असे शब्दांचे अर्थ लावण्याचे खेळ बरेच वेळा चालू असतात मला कुठलाही मराठी शब्द किंवा इंग्रजी शब्द घेऊन त्याची उहापोह करायला आवडते तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल तर जरूर लाईक च बटन दाबा. धन्यवाद😊
- आरती होनप (१८-६-२०२४)